एखाद्या परीक्षेला किंवा मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे आणि कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी काही टिप्स....
१. कुठलीही परीक्षा असो व मुलाखत असो आपल्या शरीरातील Adrenaline चे प्रमाण वाढते.
२. परंतु म्हणतात ना 'उखळात डोके खुपसले तर मूसळाची भीती कशाला ?' पाण्याची भीती पाण्यात उतरेपर्यंत एकदा पाण्यात उतरले कि आपोआप पोहायला येते कारण त्यासाठी 'Survival Instinct' कमी येते.
३. मुलाखतीसाठी बोलावणे आल्यावर आपण आपली तयारी जोमात सुरु करायला हवी.
४. ज्या विषयावर मुलाखत होणार असेल त्याचा सखोल अभ्यास हवा. त्याची तयारी करावी.
५. मुलाखतीसाठी मागविलेले सर्व कागदपत्र एका फाईल मध्ये ठेवून चांगल्या प्रकारे टाचून घ्यावेत म्हणजे कागद गहाळ होणार नाहीत.
६. मुलाखतीसाठी सरावातील वापरलेले कपडे स्वच धुवून इस्तरी करून ठेवावेत. सूट घालायचा असेल तर ड्रायक्लिन करून घ्यावा. त्यात लॉन्ड्रीचा गंध असायला नको म्हणून लॉन्ड्रीतून सूट आल्यावर एक दिवस उन्हात वाळवून घ्यावा. शक्यतो नवीन कोरे कपडे वापरू नयेत. स्वच्छ रुमाल काढून ठेवावा.
७. सूट सोबत मॅचिंग टाय प्रेस करून घ्यावी. मात्र भडक रंगाचा सूट आणि टाय टाळावेत.
८. बूट नीट पॉलिश करून ठेवावेत. मोजे धुवून घ्यावेत. नवीन घेतले तरी चालेल.
९. आदल्या रात्री लवकर जेवून कमीतकमी आठ तास झोप घावी म्हणजे मुलाखतीच्यावेळी डोळ्यात झोप तरंगायला नको.
मुलाखतीच्या दिवशी, लक्षात ठेवा:
- तुमच्या वेळापत्रकाची योजना करा जेणेकरून तुम्ही 10 ते 15 मिनिटे लवकर पोहोचाल.
- सकारात्मक राहा. नोकरीसाठी योग्य पद्धतीने कपडे घाला.
- तुमचा MP3 प्लेयर, कॉफी, सोडा किंवा बॅकपॅक घरी किंवा तुमच्या कारमध्ये ठेवा.
- तुमचा सेल फोन बंद करा.
- तुमची विनोदबुद्धी आणा आणि स्मित करा!
१०. सकाळी नित्यकर्म आटोपून स्नान करावे. शक्यतो खूप स्ट्रॉंग गंध असलेले perfume किंवा Deo वापरू नये. अगदी mild Deodorant वापरावा. पाणी कमी प्यावे त्यामुळे वेळोवेळी वॉशरूमला जाण्याची पाळी येणार नाही. मुलाखतीच्या नावाने किडनी जास्त काम करते.
११. मुलाखतीच्या ठिकाणी वेळेच्या कमीतकमी अर्धा तास आधी पोहचू अशा तर्हेने घरून बाहेर पडावे.
१२. मुलाखतीच्या आधी ज्या औपचारिकता आहेत त्या पूर्ण कराव्यात.
१३. मुलाखतीसाठी जेव्हा नाव बोलावल्या जाते त्या आधी ज्यांची मुलाखत पूर्ण झाली अशा व्यक्तीकडून मुलाखत मंडळाची संरचना आणि हॉल ची स्थिती जाणून घ्यावी म्हणजे जाताना अगदी आत्मविश्वासाने हॉल मध्ये पदार्पण करता येईल.
१४. हॉल मध्ये जाण्याआधी 'मी आत येऊ का' हे विचारायला विसरू नका. कारण जरी बोलावणे आले तरी मंडळी कांही विचारविमर्श करीत असतील तर त्यांना व्यत्यय यायला नको.
१५. हॉल मध्ये गेल्यावर छान मंडळाच्या सर्व सदस्याकडे एक नजर टाकून अध्यक्षाला काळानुसार अभिवादन करावे उदा. Good Morning /Afternoon /Evening किंवा सुप्रभात, नमस्कार ई .
१६. बसायला सांगितल्याशिवाय बसू नये. तोपर्यंत ठामपणे न विचलित होता उभे राहावे.
१७. खुर्चीवर बसल्यावर हात टेबलावर न ठेवता आपल्या मांडीवर हात ठेवून सरळ नजरेने अध्यक्षांकडे बघून प्रश्नांची वाट पाहावी.
१८. प्रश्न कुठलाही सदस्य विचारो, त्यांच्याकडे एकदा पाहावे आणि उत्तर अध्यक्षाकडे पाहून द्यायचे.
१९. जर कुणी सिगारेट पित असेल आणि तुम्हाला ऑफर केली तर चुकून घेऊ नका.
२० विचारलेल्या प्रश्नाला चांगल्याप्रकारे ऐकून घ्या समजून घ्या त्यावर विचार करा, आणि आपले उत्तर योग्य आहे ह्याची खात्री झाल्यावरच उत्तर द्या चुकीचे आणि अर्धवट उत्तर कदापि देऊ नका.
२१. एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वगुणसंपन्न आणि सर्वज्ञाता अशी व्यक्ती ह्या भूमंडळावर नाही.
२२. उत्तर येत नसेल तर दिलगिरी व्यक्त करा, तीसुद्धा आत्मविश्वासाने.
२३. नेहमी प्रामाणिकपणा आणि सचोटी हीच कामी येते.
२४. मुलाखत संपल्यावर हळूच उठून खुर्ची हळुवार जागच्या जागी ठेवा. सर्वांना धन्यवाद द्या. एकदम मागे न वळता जरा वळणाने जाऊन बाहेर या.
२५. तुमची मुलाखत यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
२६. मी दिलेल्या टिप्स अगदी चपराश्यापासून तर सनदी अधिकाऱ्याच्या मुलाखतीसाठी उपयुक्त ठरेल.
FAQ.
Que. 1. 5 सर्वात कठीण मुलाखत प्रश्न कोणते आहेत? -What are the 5 hardest interview questions?
Ans. सर्वात कठीण मुलाखत प्रश्न (आणि उत्तरे)
- तुमची सर्वात मोठी कमजोरी काय आहे?
- आम्ही तुम्हाला का नियुक्त करावे?
- तुमच्या शेवटच्या नोकरीबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नाही?
- तुम्हाला ही नोकरी का हवी आहे?
- सहकार्यासोबतच्या संघर्षाला तुम्ही कसे सामोरे जाल?
- तुमच्यासाठी हे एक उत्तर आहे.
Que. 2. 10 सर्वात सामान्य मुलाखत आणि उत्तरे कोणती आहेत? - What are the 10 most common interview and answers?
Ans. 10 सर्वात सामान्य मुलाखत प्रश्न आणि उत्तरे
- मला तुझ्याबद्दल सांग.
- तुम्हाला आमच्या कंपनीकडे कशाने आकर्षित केले?
- मला तुमच्या सामर्थ्याबद्दल सांगा.
- मला तुमच्या सामर्थ्याबद्दल सांगा.
- पाच वर्षांत तुम्ही स्वतःला कुठे पाहता?
- मला अशा वेळेबद्दल सांगा जिथे तुम्हाला व्यावसायिक आव्हानाचा सामना करावा लागला?
Que. 3. मुलाखतीसाठी 5 चांगल्या टिप्स काय आहेत? - What are 5 good tips for an interview?
Ans. नोकरीच्या यशस्वी मुलाखतीसाठी या 5 टिपा!
- तुमच्या मुलाखतीत वक्तशीर व्हा. नोकरीच्या मुलाखतीला वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ...
- कंपनीवर तुमचे संशोधन करा. ...
- शाब्दिक संवाद विसरू नका. ...
- सर्वांशी नम्र वागा. ...
- तुमच्या मुलाखतीसाठी तयार रहा.
Que. 4. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम उत्तर का नियुक्त करावे? -Why should we hire you answer best?
Ans. सुरुवातीच्यासाठी, माझ्याकडे नोकरीच्या वर्णनात सूचीबद्ध केलेली सर्व कौशल्ये आणि अनुभव आहेत आणि मला खात्री आहे की मी तुमच्या कंपनीवर त्वरित प्रभाव पाडू शकेन. फॉर्च्युन 500 कंपन्यांच्या यशस्वी प्रकल्पांची केवळ माझी पार्श्वभूमी नाही, तर त्या उद्योगाबद्दलची माझी आवडही आहे जी मला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते.
Que. 5. तुम्ही दबाव कसे हाताळता? - How do you handle pressure?
Ans. दडपणाचा सामना करण्यासाठी समजूतदार जीवनशैली केंद्रस्थानी असते, त्यामुळे नियमित व्यायाम करा, निरोगी आहार ठेवा आणि भरपूर झोप घ्या. तथापि, या कॉमनसेन्स पायऱ्या स्वतःहून पुरेसे नाहीत. दबावाला सक्रियपणे प्रतिसाद दिल्याने त्याचा तुमच्यावर होणारा नकारात्मक प्रभाव व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते.