स्कॅम कॉल करणाऱ्यांना तुमचा नंबर कसा मिळतो? जाणून घ्या तुमच्या नंबरचे स्टेटस
आजकाल प्रत्येकाकडे इंटरनेट आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यावर आपण विविध फॉर्म्स भरण्यापासून ते आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये लॉगइन कारण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी करत असतो आणि या सर्वांसाठी आपण आपली ओळख पटवून देण्यासाठी आपल्या चालू फोन नंबरचा वापर करतो.
आपल्या ई-मेल आयडीप्रमाणेच आपला फोन नंबरदेखील आपल्या वैयक्तिक माहितीअंतर्गत येतो, ज्याचा उपयोग प्रत्येक जण दररोज करत असतो. म्हणूनच फसवणूक करणारे आपल्या फोन नंबरचा वापर करतात. हे नंबर्स मिळविण्यासाठी ते खालील पद्धतींचा वापर करतात.
डार्क वेब
फसवणूक करणारी टोळी डार्क वेबवर विक्रीसाठी असलेल्या फोन नंबर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. ‘टेक्स्टमॅजिक’च्या माहितीनुसार, एखाद्या अमेरिकन नागरिकाची वैयक्तिक माहिती ही केवळ आठ डॉलर्स म्हणजे ६७७ रुपयांना विकत घेता येते. त्यामुळे पैसे खर्च करून लोकांची वयक्तिक माहिती विकत घेता येत असल्याने स्कॅम करणारे या डार्क वेब चा फायदा घेतात. आपल्या माहितीशिवाय आपली वयक्तिक माहिती विकल्या जाते याची आपल्याला खबर देखील नसते.
नंबर जनरेटर
ऑटो-डायलर नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर फसवणूक करणाऱ्यांकडून केला जातो. यामध्ये हे तंत्र, कोणत्याही व्यक्तीचा नंबर शोधून त्या व्यक्तीला फोन करते.
सोशल मीडिया आणि इंटरनेट
सोशल मीडिया आणि इंटरनेट - प्रत्येकाचे फोन नंबर हे इंटरनेटवर, विविध सोशल मीडिया माध्यमांवर, वेबसाइट्स आणि फोन डिरेक्टरीमध्ये वापरले जातात. याच इंटरनेटवरील माहितीतील फोन नंबर गोळा करण्यासाठी, फसवणूक करणारे ‘वेब-स्क्रॅपिंग’सारख्या तंत्रांचा वापर करतात.
फसवणूक करणारे आपल्या फोन नंबरचा वापर कसा करतात?
पैसे चोरण्यासाठी
खाजगी माहिती मिळवण्यासाठी
डिजिटल किंवा ऑनलाइन खात्यांचा ताबा मिळवण्यासाठी
स्कॅम कॉल्सपासून सावधान कसे राहावे?
- कोणतीही सरकारी संस्था तुम्हाला फोन करून, कोणत्याही गोष्टीसाठी तातडीने पैश्यांची मागणी करत नाहीत अथवा तुमची खाजगी माहिती तुम्हाला विचारात नाहीत. त्यामुळे असा संशयास्पद फोन आल्यास तो फोन स्कॅम कॉल असण्याची शक्यता असते; असे फोन ओळखावे.
- तसेच, फसवणूक करणारे कोणत्याही बँकेचे कर्मचारी असल्याचा दावा करून तुमच्याकडून तुमची वैयक्तिक किंवा खाजगी माहिती फोन करून विचारू शकतात. मात्र, अधिकृत बँका अशी माहिती मागत नाहीत. त्यामुळे कुणी तुम्हाला फोनवरून अशी माहिती विचारल्यास सावध राहावे.
- अशुद्ध किंवा चुकीचे इंग्रजी बोलल्यानेदेखील अनेक फसवणुकीचे प्रकार पकडण्यात आले आहेत. त्यामुळे अनोळखी नंबरवरून बोलणारी व्यक्ती कुठून बोलत आहे आणि कशी बोलत आहे याबद्दल सतर्क राहावे.
.png)