गावातल्या तरुणांना हा व्यवसाय करण्यासाठी सरकार देतय लाखोंचं अनुदान...
मित्रांनो तुम्ही जर गावात राहत असाल, सध्या बेरोजगार असाल आणि तुम्हाला जर गावात राहून व्यवसायात उतरायचे असेल तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. या व्यवसायासाठी सरकार 4.4 लाख रुपयांचे अनुदान देते. गावात बसून तुम्ही माती परिक्षणाचा व्यवसाय सहज करु शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
माती परीक्षण केंद्र कसे सुरु करायचे ?
मित्रांनो कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्याला एक निश्चित ठिकाण असायला हवं असत पण माती परीक्षण केंद्र तुम्ही दोन प्रकारे चालवू शकता.पाहिलं म्हणजे निश्चित माती परीक्षण प्रयोगशाळा असून ती तुम्ही स्वतःच्या जागेत किंवा दुकान भाड्याने घेऊन सुरू करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग आणि जाहिरात सुद्धा करावी लागणार. जेणेंकरू जास्तीत जास्त लोक तुमच्या प्रयोगशाळेत त्यांच्या चांगल्या उत्पन्नासाठी माती परीक्षण करून घेतील.
आणखी वाचा:- विहीर अनुदान योजना, विहीर खोदा आणि मिळवा ४ लाख रुपये अनुदान- असा करा ऑनलाईन अर्ज
आणखी वाचा:- विहीर अनुदान योजना, विहीर खोदा आणि मिळवा ४ लाख रुपये अनुदान- असा करा ऑनलाईन अर्ज
दुसरी म्हणजे मोबाईल व्हॅन. याद्वारे तुम्ही एखादे वाहन खरेदी करू शकता आणि माती परीक्षणासाठी आवश्यक उपकरणांसह ते सेटअप करू शकता. या मोबाईल व्हॅन मुले तुम्ही गावोगाव फिरून माती परीक्षण करून तुम्ही चांगला नफा कमवू शकतात. या प्रकारामध्ये तुमच्या व्यवसायाची जाहिरात तर होतेच पण लोकांची माती परीक्षण करून घेण्याची तत्परता सुद्धा जास्त असते.
याव्यतिरिक्त, 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती मृदा आरोग्य कार्ड योजनेद्वारे एक मिनी माती परीक्षण केंद्र सुरु करू शकतात.
माती परीक्षण केंद्रासाठी आवश्यक पात्रता
- हा व्यवसाय करण्यास इच्छुक व्यक्तीला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच कृषी क्लिनिक आणि शेतीची चांगली माहिती असणे आवश्यक आहे.
- मुख्य म्हणजे प्राप्तकर्ता शेतीच्या पार्श्वभूमीतून आला पाहिजे.
- तुम्हाला मृदा आरोग्य कार्ड योजनेचा एक भाग म्हणून माती निरीक्षण केंद्र सुरु करायचे असल्यास, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन उपसंचालक किंवा सहसंचालक यांच्याशी बोलणे करू शकता.
महिन्याला किती कमाई होईल?
शेतकरी त्यांच्या शेतातील मातीचे नमुने तुमच्यासाठी चाचणी केंद्रावर तीनशे रुपये प्रति नमुन्यासाठी घेऊन येतील. या संधीमुळे तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते.संपर्क कोठे करावा?
तुम्हाला माती परीक्षण केंद्र उघडण्याची इच्छा असल्यास, तुम्ही soilhealth.dac.gov.in या वेबसाइटद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.तसेच अतिरिक्त माहितीसाठी किसान कॉल सेंटर 1800-180-1551 वर संपर्क साधू शकता.
%20(1).png)
.png)