चँट जीपीटी म्हणजे काय? चँट जीपीटी वापरण्याचे फायदे/तोटे काय? - Chat GPT Meaning in Marathi
Generative pre-training transformer अर्थात, Chat GPT हे ओपनएआय (openai) या कंपनीने विकसित केलेले असून ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित एक आर्टिफिशिअल मॉडेल आहे. जे मानवासारखा मजकूर लिहण्यासाठी प्रशिक्षित केलेले आहे. महत्वाचे म्हणजे हे विविध भाषा आणि विविध शैलींमध्ये मजकूर तयार करण्यासाठी वापरता येत असून हि सेवा सध्या पूर्णतः मोफत आहे.
सोप्या मराठी भाषेत सांगायचे झाले तर, असा एक प्रशिक्षित व्यक्ती जो आपल्याला हवा असलेला मजकूर अगदी काही सेकंदात आपल्याला उपलब्ध करून देतो. ही सेवा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असल्याने खूप जास्त प्रगत झालेली दिसते आणि त्याचे फायदे भविष्यात लोकांना महत्वाचे असले तरी, त्याला काही मर्यादा सुद्धा आहेत. ते आपण पाहूया.
जीपीटी 3 (GPT 3) काय आहे? What is GPT 3?
जीपीटी 3 हे ओपनएआयने विकसित केलेले एक असे मॉडेल आहे कि, प्रश्नकर्त्याचा प्रश्न समजून त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर एका विशिष्ट फॉरमॅट मध्ये जसे त्याला पाहिजे तसे अगदी काही क्षणात उपलब्ध करून देते. जसे कि, ते उत्तर एखाद्या अनुभवी लेखकांद्वारे लिहण्यात आहे आहे. हा एक असा अल्गोरिदम आहे, जो कुठल्याही मजकुराला विविध भाषेत भाषांतरीत करतो, विविध शब्द डेटा यांचा क्रम लावून त्यांचे विश्लेषण करतो. आणि हे आऊटपुट टेक्स्ट तसेच इमेजच्या स्वरूपात उपलब्ध करतो.
जीपीटी 3 (GPT 3) चा वापर कशासाठी होतो? जीपीटी 3 (GPT 3) चे फायदे काय आहेत?
जीपीटी 3 (GPT 3) या AI मॉडेलचा वापर विविध लेखन कामांसाठी केला जाऊ शकतो. तसेच संभाषण, भाषांतर आणि कोडिंग अशा विविध कामांसाठी केला जाऊ शकतो.
संभाषण करण्यासाठी :
जीपीटी मॉडेल्स हे मानवासारखे संभाषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याला अगदी माणसासारखे प्रशिक्षित केलेले असल्याने हे सहज शक्य आहे.
भाषांतर आणि मजकूर लिहण्यासाठी :
एका भाषेतून दुसर्या भाषेत मजकूर भाषांतरित करण्यासाठी GPT मॉडेल्स चांगले प्रशिक्षित केलेले असल्याने ते कुठल्याही भाषेत त्वरित भाषांतर तयार करू शकतात जे मानवी अनुवादकाद्वारे तयार केलेल्या शैली आणि सामग्री सारखेच असते.
कोडिंग करण्यासाठी :
सामान्य माणसाला अत्यंत कठीण वाटणारे काम जीपीटी मॉडेल्स द्वारे अगदी काही क्षणात केले जाते. कोडिंग हि अत्यंत किचकट अशी प्रणाली आहे. ज्याला बनवण्यासाठी जास्त मेहनत आहे वेळ लागतो. जीपीटी मॉडेल्स कोडिंग करणे आताकाही प्रमाणात सोपे होईल.
अष्टपैलुत्व:
कार्यक्षमता:
GPT मॉडेल कमी वेळात आणि अचूकतेसह मजकूर तयार करते. ज्यामुळे AI सॉफ्टवेअर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मजकूर तयार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
चॅट जीपीटी (Chat GPT) चे तोटे :
मजकूर लिहण्यासाठी जर अशा GPT मॉडेल्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला तर त्याचे काही संभाव्य तोटे देखील उद्भवू शकतात. जसे की,
मर्यादित माहिती :
कोणतेही तंत्रज्ञान असुद्या ते कितीही प्रगत झाले तरी त्याला काही मर्यादा असतातच, चॅट जीपीटी (Chat GPT) द्वारे विविध विषयावरील मजकूर सहज मिळत असला तरी, सर्वच मजकूर ते उपलब्ध करू शकत नाही. कारण ते तंत्रज्ञान सुद्धा मानवानेच निर्मित केले आहे, जेवढे त्याचे प्रक्षिशण झाले तेव्हढेच ते माहिती पुरवू शकते. जशी जशी नवीन माहिती त्यात ऍड केल्या जाईल तसे ते प्रगत होत जाईल.
समजूतदारपणाचा अभाव :
GPT मॉडेल्सना त्यांनी उपलब्ध केलेल्या शब्द आणि वाक्प्रचारांच्या अर्थाची किंवा संदर्भाची सखोल माहिती नसते. ते फक्त प्रशिक्षण डेटामधून शिकलेल्या नमुन्यांवर आधारित मजकूर उपलब्ध करून देते. ते कोणत्याही एखाद्या वाक्याचा अर्थ स्पष्ट करून सांगू शकत नाही.
प्रशिक्षण डेटा मधील चुका :
लहान मुलांना आपण जसे शिकवतो तसे ते शिकते आणि तसेच आचरण करते.तसेच GPT मॉडेल्सना जसे प्रक्षिशण दिले गेले आहे तसेच ते माहिती उपलब्ध करून देते.
भविष्यातील चिंता:
मानवासारखा मजकूर तयार करण्याची GPT मॉडेलची क्षमता बऱ्यापैकी असली तरी ते मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रगत होऊ शकत नाही, जर त्याला चुकीची माहिती दिल्या गेली तर ते चुकीच्याच माहितीचा प्रचार करेल, यातून समाजात चुकीचा संदेश जाऊन समाजावर खूप मोठे परिणाम होण्याची शक्यता नाकारल्या जात नाही.त्यामुळे भविष्यात असे मॉडेल्स वापरण्याचे संभाव्य परिणाम आणि नैतिक परिणाम विचारात घेणे महत्त्वाचे ठरते.