EPFO : लाखो ग्राहकांना EPFO ने दिलं मोठं गिफ्ट, जाणून घ्या सविस्तर माहिती
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने आपल्या लाखो ग्राहकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ते म्हणजे क्लेम करण्याऱ्या ग्राहकाचा दावा अनेकवेळा नाकारला जात होता. आणि नाकारलेल्या दाव्याबद्दल त्यांना कोणतेही कारण सांगितले जात नव्हते. परंतु, आता या ग्राहकांना त्यांचा दावा का नाकारण्यात आला आहे, ते नाकारण्याचे कारण सांगण्याचा आदेश EPFO ने निर्गमित केला आहे.
काय आहे गिफ्ट?
ईपीएफओच्या (EPFO) नवीन आदेशामुळे ईपीएफच्या क्लेमसाठी दावा करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, ग्राहकांना आता EPF दावा का नाकारला गेला आहे, दावा स्वीकारला की नाही हे पहिल्याच क्षणी समजणार आहे. जर दावा नाकारल्या गेला असेल तर, ग्राहकांना त्यामध्ये सांगितलेल्या दुरुस्त्या करून पुन्हा क्लेम साठी नवीन अर्ज करता येईल, त्यामुळे क्लेम सेटलमेंटमध्ये पुन्हा कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेता येईल. आणि दावा लवकरात लवकर निकाली काढल्या जाईल.
कोणत्या ग्राहकांना होणार फायदा?
काही जणांसोबत अनेक वेळा असे होते की, ज्यावेळी सदस्य ईपीएफ (EPF) दाव्यासाठी अर्ज करतात, त्यावेळी त्यांना दावा नाकरल्याचा सामना करावा लागतो. वरून त्यांना त्याबाबत कोणतीच माहिती दिल्या जात नाही. यामुळे ग्राहकांना पुन्हा अर्ज करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु, आता ईपीएफओच्या नवीन आदेशानुसार EPFO ला दावा का नाकारला गेला त्याचे कारण सांगावे लागेल.
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, दावा मान्य केल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे दावे निकाली काढण्यास उशीर होत आहे. त्यावर लवकरच तोडगा काढणार आहे.