एखाद्या व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतले आणि त्याचा मृत्यू झाला तर, बँक कर्ज माफ करते का? जाणून घ्या सविस्तर - How Does the Bank Recover the Loan in Case of Death of the Borrower?
आताच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे प्रत्येकाला खूप सोपे झाले आहे. अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना होम लोन, ऑटो लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन इत्यादी कर्जासाठीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून देतात. याशिवाय ऑनलाईन ऍपद्वारे देखील ग्राहक कर्जासाठी सहज अर्ज करू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखादे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, ते कर्ज परतफेड करण्याच्या (Bank Loan Recovery Rule) काही महत्वपूर्ण नियमांबद्दल जाणून घायला हवे.
बँकचे कर्ज वसुली नियम (Bank Loan Recovery Rule)
एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल आणि ते परतफेड करण्याआधी त्याचा मृत्यू झाला तर, बँक त्या कर्जाची वसुली (Bank Loan Recovery Rule) कशी करते? भारतात अशी अनेक प्रकरणे नेहमी घडत असतात, कारण कोणाचा कधी मृत्यू होईल हे सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा बँकेकडे कर्जवसुली करण्यासाठी तीन पर्याय असतात. ते खालीलप्रमाणे...
बँकेकडे पहिला पर्याय आहे-
बँकेकडे दुसरा पर्याय आहे -
कर्जावर कोणतीही विमा पॉलिसी घेतली नसेल, तर बँक त्या कर्जावर हमीदार (Guarantor) किंवा सह-अर्जदार (Co-applicant) आहे की नाही ते पाहते. जामीनदार (Guarantor) किंवा सह-अर्जदार (Co-applicant) असल्यास, कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक त्यांच्याकडून कर्ज वसूल करू शकते.
बँकेकडे तिसरा पर्याय आहे -
कर्जावर विमा पॉलिसी (Insurance policy), जामीनदार (Guarantor) किंवा सह-अर्जदार (Co-applicant) नसल्यास, कर्जाच्या बदल्यात बँकेने ठेवलेली सुरक्षा/तारण पहिले जाते, गृहकर्जाच्या बाबतीत जसे तुमच्या घराची कागदपत्रे बँकेकडे गहाण ठेवली जातात, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या कर्जाच्या बाबतीत तुमच्या व्यायसायाची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली जाते. मग जेव्हा बँकेकडे कर्ज परत मिळवण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही, तेव्हा बँक तुमची गहाण/तारण ठेवलेली मालमत्ता विकून देखील ते कर्ज वसूल करू शकते.
वैयक्तिक कर्जाबद्दल महत्वाचे-
वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाच्या बाबतीत, ज्यावर बँकेने कोणतीही मालमत्ता गहाण ठेवली नाही आणि कोणताही जामीनदार किंवा सह-अर्जदार नाही, किंवा कोणतीही विमा पोलिसी नसेल तर, अशा परिस्थितीमधील कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज वसूल करता येत नाही. ते बँकेचे बुडीत कर्ज म्हणून ग्राह्य धरल्या जाते.
परंतु, आजकाल वाढत्या स्पर्धे मुळे बऱ्याच बँका विनातारण कर्जे देत असल्या तरी, बँक परतफेडीच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कर्जदाराचा विमा त्याच्या कर्जातून काढत असते. त्यामुळे कर्जदाराच्या मृत्यू झाल्यास बँकेकडे कर्जवसुलीचा हा सर्वोत्तम पर्याय असतोच.