आता घरबसल्या तुम्ही तुमच्या आधारमधील पत्ता करू शकतात अपडेट! वाचा संपूर्ण प्रक्रिया
त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड वरील तुमच्या घराचा पत्ता बदलणे गरजेचे असते. आता ही पद्धत अगदी सोपी असून तुम्ही तुमच्या घरी बसून आधार कार्डवरील तुमच्या घराचा पत्ता बदलवू शकतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्डवरील घराचा पत्ता घरी बसून ऑनलाइन पद्धतीने अपडेट करू शकता तो याकरिता फक्त तुम्हाला पन्नास रुपये इतके शुल्क लागते.
असा करा तुमचा अड्रेस अपडेट
- याकरिता तुम्हाला सगळ्यात आधी युआयडीएआयच्या myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- या ठिकाणी गेल्यानंतर लॉगिन करण्याकरता तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकणे गरजेचे राहील. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा व सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो व हा आलेला ओटीपी नमूद करावा आणि लॉगिन करावे.
- लॉगिन केल्यानंतर आधार अपडेट या पर्यायावर जावे व प्रोसीड टू आधार अपडेट या पर्यायावर क्लिक करावे.
- यामुळे तुमचा सध्याचा पत्ता तुमच्यासमोर येतो.
- नंतर तुम्हाला अपडेट करायचा असलेल्या पत्त्याचा पर्याय समोर येतो.
- नंतर तुम्हाला तुमचा नवीन पत्ता असलेले एखादे कागदपत्र सबमिट करावे लागेल.
- हे कागदपत्र सबमिट केल्यानंतर खाली दोन चेक बॉक्स असतील त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल आणि नेक्स्ट वर क्लिक करावे लागेल.
- नंतर पेमेंटचा पर्याय येईल व या ठिकाणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नेट बँकिंग किंवा यूपीआय द्वारे पेमेंट करू शकतात.
- पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल व त्यानंतर साधारणपणे सुमारे 30 दिवसात तुमच्या आधार कार्ड अपडेट होईल.
![]() |