वन मेंबर वन इपीएफ अकाउंट ट्रान्सफर रिक्वेस्ट (One Member – One EPF Account : Transfer Request) पर्यंत सर्व प्रोसेस तुम्ही केली असेल तर PF Final Settlement Online process करण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.
- फायनल सेटलमेंटचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस (Online Services) या ऑप्शनवर जाऊन त्यामधे Online Claim हा पर्याय निवडा.
- ऑनलाईन क्लेम या पर्यायावर आल्यानंतर क्लेमसाठी फॉर्म 31, 19, 10C आणि 10D हे ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर त्यामधे बँक अकाउंट नंबर टाकून Verify करायचा आहे, व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतील आणि फॉर्म 19, फॉर्म 10C आणि फॉर्म 31.
- यामधून सर्वप्रथम फॉर्म 19 आणि भरून घ्यायचा त्यानंतर फॉर्म 10C भरून घ्यायचा.
- फॉर्म-19 हा तुमची जमा असलेली रक्कम काढण्यासाठी असतो.
- फॉर्म 10 सी – ही तुमची पेन्शनची अमाऊंट काढण्यासाठी असतो.
- या फॉर्मची संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार ओटीपी ला रिक्वेस्ट करा आणि ओटीपी टाकून क्लेम सबमिट करा.
जास्तीत जास्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमची pf final settlement रक्कम काढण्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर पीएफच्या कालावधीनुसार पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटला संपूर्ण रक्कम जमा होते.
EPFO Provident Fund: फायनल सेटलमेंटची सर्व प्रोसेस करण्यासाठी इथे क्लिक करा.