EPS Certificate ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.
पायरी १. सर्वात अगोदर, UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्डचा वापर करुन लॉग-इन करा.
पायरी २. त्यानंतर, मेन्यूमध्ये ऑनलाइन सेवा online services वर क्लिक करा. याठिकाणी क्लेम (फॉर्म – 31, 19 आणि 10C) हा पर्याय निवडा.
पायरी ३. EPFO रेकॉर्डमध्ये तुमचा नोंदणीकृत बँक क्रमांक नोंदवा आणि त्याचा पडताळा करा. यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रावर क्लिक करुन YES हा पर्याय निवडावा लागेल.
पायरी ४. “I want to apply for” हा पर्याय निवडा. “only pension withdrawal (Form 10C)” वर क्लिक करा.
पायरी ५. ईपीएफओ रेकॉर्डमध्ये तुमचा पत्ता नोंदवा. डिस्कलेमर वर क्लिक करा. आधार कार्डच्या माध्यमातून ओटीपी मिळवा.
पायरी ६. आता ओटीपीची नोंद करा. त्याचा पडताळा करा. त्यानंतर अर्ज जमा करा.
पायरी ७. तुमचा अर्ज तपासल्यानंतर EPS Certificate तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल.
ऑनलाईन EPS Certificate मिळवण्यासाठी: येथे क्लिक करा.
किंवा अधिक माहितीसाठी EPFO च्या अधिकृत Member Home EPFO पोर्टलवर भेट द्या.