शून्य % व्याजदर म्हणजे काय? जर व्याज नाही तर शून्य % असे का लिहितात?
कर्ज घेण्यासाठी आजकाल एवढ्या नवनवीन जाहिराती पाहायला मिळत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे शून्य % व्याजदर ही जाहिरात आहे. या लेखामध्ये आपण शून्य % व्याजदर म्हणजे काय? जर व्याज घेत नाही तर शून्य % व्याजदर असे का लिहतात? याबद्दल जाणून घेणार आहोत.
वेगवेगळ्या वित्तीय संस्था 0% व्याजदरासहित आपल्याला त्याचे महत्त्व पटवून देत असतात. पण खरेच यामध्ये काही तथ्य आहे का? की फक्त ग्राहकांना भुलवून त्यांची फसवणूक केली जाते.
पहिला प्रश्न - 0 % व्याजदर म्हणजे काय?
याचा सरळ सरळ अर्थ होतो तुम्हाला मिळत असलेल्या कर्जावर तुम्ही कोणतेही व्याज द्यायचे नाही.तुम्हाला जी कर्जाची रक्कम मंजूर केली जाते त्याच्यावर कोणतेही व्याज न आकारता त्याचे समान मासिक हफ्ते केले जातात.पण खरोखरच असे घडते का? तर अजिबात नाही. मित्रानो लक्षात घ्या जगात कोणतीही गोष्ट मोफत नाही. आणि जर काही मोफत मिळत असेल तर आपण स्वतःच एक प्रॉडक्ट बनतो, याची जाणीव ग्राहकाला होऊ दिली जात नाही. अप्रत्यक्षरित्या आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याची किंमत चुकवत असतो.
हे देखील माहिती हवे:- कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँक कोणती कार्यवाही करते.
वरील उदाहरणात सुध्दा हेच आहे. 0% व्याजदर हे मूळ रकमेवर न आकारता प्रक्रिया शुल्क (Processing Charge) यामधून घेतले जातात. याशिवाय त्या वस्तूची कमाल किंमत चुकती करावी लागते.
उदा: तुम्ही तुमच्या घरी छानसा टी व्ही घेणार आहात. त्या टी व्ही ची कमाल किंमत ३५००० आहे. समजा, तो टी व्ही तुम्ही रोखीने घेत असाल तर त्याची किंमत ३०००० असते. पण ती किंमत तुम्हाला कधीच थेट कळू दिली जात नाही. वरील ५००० रुपये व प्रक्रिया शुल्क तुमच्याकडून वसूल केले जाते. त्या टी व्ही ची किंमत अगोदरच वाढवून त्यांनी त्यांचा व्याज दर वसूल केलेला असतो. तुमच्यासमोर दिमाखात ठेवला जातो तो 0% व्याजदराचा बोर्ड. जो आपणाला आकर्षित करत असतो.
दुसरा प्रश्न- जर व्याज नाही तर 0% व्याजदर असे का लिहितात?
कारण सर्वसाधारणपणे कर्ज म्हंटले की आपण व्याजदर किती आहे ते पाहतो. जर काहीच दिले नसेल तर आपण शंका घेण्याची दाट शक्यता असते. म्हणून त्यासाठी 0% हा फंडा वापरला जातो.लोकांना कर्ज म्हणून दिलेली रक्कम परत न केल्यास बँकेकडून कोणती पावले उचलली जाऊ शकतात? किंवा बँक कोणती कार्यवाही करते? याबद्दल खालील लेख वाचा.
हे देखील माहिती हवे:- कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँक कोणती कार्यवाही करते.