चोरांनी स्विच ऑफ केला तरी सापडेल तुमचा फोन, आत्ताच ऑन करा 'ही' सेटिंग
आजकाल तुम्ही कोणताही स्मार्टफोन घ्या त्यामध्ये बायडीफॉल्ट जीपीएस प्रणाली असतेच. त्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी तो शोधता येतो. मात्र, यासाठी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे हरवलेला फोन चालू, म्हणजेच स्विच ऑन असायला हवा. पण आता मात्र गुगलने एक नवीन अपडेट लाँच केलं आहे, यामुळे तुमचा फोन बंद म्हणजे स्विच ऑफ असला, तरीही तो शोधता येणार आहे.
गुगलचं फाइंट माय डिव्हाईस हे फीचर एखाद्या स्मार्टफोनची लोकेशन शोधण्यासाठी वापरलं जातं. यापूर्वी गुगलच्या या फीचरचा वापर करण्यासाठी तुमचा फोन ऑन असणं गरजेचं होतं. मात्र, आता गुगलच्या नव्या अपडेटनंतर ही अट गरजेची नसेल. नव्या टेक्नॉलॉजीमुळे जगभरातील इतर अँड्रॉइड डिव्हाईसेसची मदत घेऊन स्विच ऑफ असणारा अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेट शोधता येईल.
गुगल फाइंड माय डिव्हाईस असं करा ऑन
- हे फीचर ऑन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल.
- यानंतर Find My Device हे कीवर्ड्स सर्च करा.
- यानंतर Find My Device हा पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्यावर टॅप करुन तो सुरू करा.
- तुमच्या फोनमध्ये गुगल अकाउंट लॉग-इन असणं आवश्यक आहे.
हरवलेला फोन शोधण्यासाठी
- यासाठी तुम्हाला Find My Device या वेबसाईटवर जावं लागेल.
- यानंतर तुमच्या फोनमध्ये लॉग-इन असलेल्या गुगल अकाउंटवरुन लॉग-इन करावं लागेल.
- यानंतर ते अकाउंट ज्या-ज्या डिव्हाइसमध्ये लॉग-इन आहे त्याची सर्व लिस्ट तुम्हाला दिसेल.
- यानंतर तुमच्या फोनची शेवटची लोकेशन तुम्हाला पहायला मिळेल.