ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ०६ जागांसाठी जाहिरात (Thane Mahanagar Palika Bharti 2023)
Thane Mahanagar Palika Bharti 2023: ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण ०६ जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून ह्यासाठी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.
त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
पदांची नावे आणि पद संख्या
- जलनिर्देशक/ जलजिवरक्षक– ०६
- एकुण भरली जाणारी पदे – ०६
आवश्यक पात्रता आणि अनुभव
जलनिर्देशक/ जलजिवरक्षक नदी, खाडी, ओढा, समुद्र या वाहत्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये पोहण्याचा कमीत कमी २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.वयोमर्यादा
- 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण
- ठाणे महानगरपालिका, ठाणे
अर्ज प्रक्रिया
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या जलनिर्देशक/ जलजिवरक्षक यांनी जलतरण संबंधित अटी / शर्ती नमुद केलेल्या प्रमापत्राच्या प्रमाणित छायाकिंत प्रतीसह वरील संबंधित पत्यावर अर्ज सादर करावेत.
- अर्ज करताना बंद लिफाफ्यावर ‘जलनिर्देशक/ जलजिवरक्षक म्हणुन नेमणुक करणेकरिता’ त्या बाबत ठळक अक्षरात नमुद करावे. (Job Alert)
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
भरतीचे स्वरूप
- या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वात आधी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येऊ शकते.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- नागरी सुविधा केंद्र, तळ मजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) ४००६०१