भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल आस्थापनेवरील पदांच्या एकूण ५५३ जागांसाठी जाहिरात (CGPDTM Recruitment 2023)
CGPDTM Recruitment 2023: भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत महत्वाच्या 500 हुन अधिक जागांवरती भरती होणार आहे. ह्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.
त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
पदांची नावे आणि पद संख्या
- पेटंट आणि डिझाईन परीक्षक (ग्रुप-A)– ५५३
- एकुण भरली जाणारी पदे – ५५३
शैक्षणिक पात्रता
१) खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक- बायो-टेक्नोलॉजी
- बायो-केमिस्ट्री
- केमिस्ट्री
- पॉलोमर सायन्स
- कॉम्प्युटर सायन्स
- IT
- फिजिक्स
२) किंवा याव्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्याही एका शाखेमध्ये पदवी आवश्यक
- फूड टेक्नोलॉजी
- बायो-मेडिकल इंजिनिअरिंग
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन
- इलेक्ट्रिकल
- कॉम्प्युटर सायन्स
- सिव्हिल
- मेकॅनिकल
- मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग किंवा समतुल्य
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वयवर्ष 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सरासरी 21 ते 35 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे.
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
परीक्षा फी
- जनरल, ओबीसी आणि ईडब्लूएस या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये (₹1000/-) शुल्क.
- एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना पाचशे रुपये (₹500/-) शुल्क.
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारतामध्ये कुठेही.
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- पात्रताधारक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट - ipindia.gov.in व ऑनलाईन अर्ज वेबसाईट- cgpdtm.qcin.org या संकेतस्थळावर आपले आवेदन सादर करायचे आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – या भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 04 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
भरतीचे स्वरूप
या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वात आधी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येऊ शकते
परीक्षा कधी होणार?
- पूर्व परीक्षा : 03 सप्टेंबर 2023
- मुख्य परीक्षा : 01 ऑक्टोबर 2023