बँकेने क्रेडिट कार्ड बंद नाही केले तर, मिळतील 15000 रुपये!
मित्रानो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बँकेतून कॉल येत असतील की, आमच्या बँकेच्या चांगल्या ऑफर्स चालू आहेत तुमची एखादे क्रेडिट कार्ड बनवून घ्या, आणि तुम्ही एखादे क्रेडिट कार्ड बनवून सुद्धा घेतले असेल.
परंतु, तुम्ही त्या क्रेडिट कार्ड चा वापर करत नसाल, किंवा काही कारणाने तुम्हाला त्या बँकेची सेवा आवडली नसेल, अशा परिस्थितीत तुम्ही कार्ड बंद करण्याचा विचार करता. आणि बँकेत जाऊन कार्ड बंद करण्यासाठी अर्ज देता.
पण, बँकेला तुमचे कार्ड बंद करावे वाटत नाही. कारण तुम्ही कार्डचा वापर नाही केला तरी त्यांना वार्षिक फी च्या स्वरूपात नफा मिळत असतो. आणि मग ते आपल्याला आज या उद्या या अशा थापा देऊन झुलवत असतात.
परंतु, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या १ जुलै च्या नवीन नियमानुसार, जर तुम्ही बँकेला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज दिला असेल तर, अर्ज दिल्याच्या ७ दिवसात बँकेला ते कार्ड बंद करावेच लागते.
पण ७ दिवसानंतरही बँकेने तुमच्या विनंतीवर प्रक्रिया केली नसेल, आणि तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले नसेल तर, संबंधित बँकेला RBI च्या नियमानुसार प्रति दिन ५०० रुपये भरपाई म्हणून तुम्हाला द्यावे लागतील.
म्हणजे, जर बँकेने १ महिना तुमचे कार्ड बंद केले नाही तर, तुम्हाला १५००० रुपये मिळतील. मग विचार कसला करताय तुमच्याजवळ एखादे क्रेडिट कार्ड असेल, आणि तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, आजच तुमच्या बँकेत जाऊन ते कार्ड बंद करण्यासाठी अर्ज द्या.
अजूनपर्यंत तुमच्याकडे कोणतेही क्रेडिट कार्ड नसेल तर वाचा: 05 सर्वोत्कृष्ट लाईफ टाइम मोफत क्रेडिट कार्ड: असा करा अर्ज!