नोकरीच्या नावाखाली तुमची कधी फसवणूक झाली आहे का?
वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी बेरोजगारी ही खूप मोठी समस्या झाली आहे. योग्य शिक्षण झालेले असताना सुद्धा बरेच बेरोजगार नोकरीच्या शोधात भटकत असतात. त्यातच नोकरी मिळवून देण्यासाठी काही कंसल्टंसी बेरोजगार लोकांना मदत करत असतात. त्यासाठी काही जण पैसे सुद्धा घेतात. मग यात ऑनलाईन वेबसाईट कुठे मागे राहणार?
ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर Nokri.com, Shine.com सारख्या कंपन्या बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करत आहेत. मग आपली ही ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी इथे पण फसवणूक करायला तयार असतेच. आता ह्या ऑनलाईन नोकरीच्या वेबसाईट वर कशी फसवणूक केल्या जाते ते आपण या लेखात पाहू. त्यासाठी खालील उदाहरण देत आहे.
Shine.com द्वारे ऑनलाईन फसवणूक
मी इचलकरंजीच्या आहे. आणि मुंबईत एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. माझे नवीन लग्न झाले असल्याने बायकोला पण मुंबईला आणले होते. आता मुंबईत राहायचा खर्च तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे माझ्या बायकोने सुद्धा नोकरी करण्याची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली.मुंबईत जास्त कोणी ओळखीचे नसल्याने आम्ही ऑनलाईन वेबसाईट द्वारे नोकरी शोधण्यासाठी Nokri.com, Shine.com अशा वेबसाईट वर नोंदणी करण्यास सुरुवात केली.
एक दिवस माझ्या बायकोला सकाळी Shine.com मधुन फोन आला की तुम्ही जर १५००₹ भरुन प्रिमियम मेंबरशिप घेतली तर, तुम्हाला जॉब मिळण्यासाठी जास्तीत जास्त कॉल येतील. तिने याबद्दल माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही मेंबरशिप घ्यायला तयार झालो.
त्यात त्यांचे कॉल चालूच होते, आता ऑफर चालू आहे लवकर मेंबर व्हाल तर, १५००₹ मध्ये मिळेल नाहीतर, ऑफर संपली की २१००₹ लागतील वैगेरे..!
माझ्या बायकोने जेंव्हा प्रिमियम मेंबरशिप घेण्यासाठी विचारले, तेंव्हा ते म्हणाले की आम्ही एक लिंक पाठवु त्यावर क्लीक करुन ऑनलाइन पेमेंट करा.
आता योगायोग असेल अथवा आमची वाइट वेळ असेल, माझ्या बायकोने लिंक वर क्लीक केले पण कोणतेच वेबपेज उघडत नव्हते. तिने तसे त्यांना कॉल वर सांगितले असता तिकडुन त्यांनी सांगितले की, कदाचीत तुमचे इंटरनेट स्लो आहे. तुम्ही कार्ड नंबर मला सांगा मी इकडुन रजिस्टर करतो.
आता त्या माणसाने माझ्या बायकोला इतकं ब्रेनवॉश केल होतं की, तिने पण जास्त विचार न करता, कार्ड नंबर आणि CVV त्याला सांगितला. त्याने मग OTP पण विचारुन घेतला. आणि रजिस्ट्रेशन पुर्ण झाले असे सांगितले.
थोड्या वेळाने १५००₹ कट झालेला मेसेज पण आला तिला.
पण पुन्हा पाच मिनिटमध्ये आधी २१००₹ आणि मग ६५००₹ कट झालेले असे २ मेसेज आले.
तिने लगेच पुन्हा त्या नंबर वर फोन लावला. (आता तुम्ही विचार करत असाल की फोन कोणी उचलला नसेल अथवा बंद असेल पण तसे नव्हते) पलिकडुन फोन उचलला गेला व त्यांनी सांगितले की जे ज्यादा पैसे कट झाले आहेत, ते चुकुन झालेत आमच्या सिस्टम मध्ये काहितरी प्रोब्लेम झाला होता पण तुमचे पैसे २४ तासा मध्ये रिफंड होतील.
माझ्या बायको ने मला फोन करुन ही घटना सांगितली. मी लगेच तिला बँकेमध्ये फोन करुन अकाउंट ब्लॉक करायचा सल्ला दिला. आणि त्याप्रमाणे तिने केलं.
आता तुम्ही विचार करत असाल की फ्रॉड झाला. आता काय परत त्यांचा फोन आला नसेल पण तसं नव्हते.
दुसर्या दिवशी त्यांचा पुन्हा कॉल आला की तुमचे अकाउंट डिटेल मेल वर पाठवा, आम्ही ताबडतोब पैसे रिफंड करतो. पण हिने अकाउंट ब्लॉक केले आहे, असे सांगताच पलीकडुन ती व्यक्ती म्हणाली की मग दुसऱ्या अकाउंट चे डिटेल द्या जे चालु असेल. आम्ही त्यावर रिफंड चे पैसे पाठवतो. मग माझ्या बायकोने माझा फोन नंबर दिला त्या व्यक्तीला आणि मला कॉल करायला सांगितले.
मी माझ्या ऑफिस मध्ये काम करत होतो, तेवढ्यात मला कॉल आला. ती व्यक्ती सांगु लागली कि तुमचे पैसे रिफंड होनार आहेत, मला अकाउंट डिटेल्स द्या.
मी म्हणालो गुगल पे वर सेंड करा.
तर पलीकडुन तो म्हणाला की ठिक आहे, मला गुगल पे वर रिक्वेस्ट सेंड करा मी पैसे पाठवतो.
मी त्याच्या नंबर वर रिक्वेस्ट पाठवली.
तर पलीकडुन त्याचा पुन्हा कॉल आला की, सर जसं की आम्ही तुम्हाला पैसे रिफंड करणार आहोत, तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायला लागतील.
१)आधी गुगल पे अँप मधुन “पे” या ऑप्शन वर क्लीक करा.
२) तुमचे जेवढे पैसे कट झालेत तेवढी अमाउंट तिथे टाइप करा.
३) What is this for या जागेवर एक कोड मी सांगेन तो टाइप करा.
४) टाइप करुन झाल्यावर “पे” या ऑप्शन वर क्लीक करा.
५) आता तुम्हाला एक स्क्रँच कार्ड येइल त्यावर जो कोड असेल तो आम्हाला सांगा, मग लगेच पैसे जमा होतील अकाउंट वर.
एव्हाना मी समजुन गेलो होतो की हा मला पण लुबाडायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी माझे गुगल पे अँप आधी बंद केले. मी आधीच खुप संतापलो होतो. आणि त्यात या भामट्याच्या कॉल मुळे अजूनच खुप चिडलो. एक तर माझ्या बायकोची एवढी मेहनतीची कमाई हडप करुन, हा माझ्या वर पण डाव टाकायला बघत होता.
कधी कधी असं होत की संताप येउन पण माणसाला जेंव्हा कळत की, तो पुर्ण फसला गेला आहे आणि असहाय्य आहे तेंव्हा तो संताप काही कामाचा नसतो. याची जाणीव मला झाली. जेंव्हा मला कळुन चुकलं की माझ्या बायकोचे पैसे काही परत मिळनार नाहीयेत, आणि मी काहीही करु शकत नाही. तेंव्हा मी एकदम शांत झालो आणि त्याला म्हणालो...

“मित्रा तु जे काही हे करत आहेस ना, याची खुप मोठी किंमत चुकवशील तु आयुष्यात. इतकी मोठी की तुला तुझ्या जीवंत असण्यावर सुद्धा पश्चाताप होइल. हे जे पैसे तु लुबाडतो आहेस ना लोकांचे नोकरी लावण्याच्या अमिषाने कदाचीत तुझ्या माझ्यासाठी छोटी रक्कम असेल, पण काही गरजु गरीब विद्यार्थी पै पै साठवुन तुमच्या साईट वर नोंदनी करतात आणि तुम्ही नोकरी न लावता फक्त लुबाडता त्यांना, ते गरीब लोक नंतर आयुष्यातून उठतात रे. देव तुला सद्दबुद्धी देवो."
मी अस म्हणताच तो आधी बोलला की “सर काय बोलताय तुम्ही? तुमचे पैसे खरचं परत मिळनार आहेत.”
मी त्याला म्हणालो मला नको आहेत माझे पैसे.
तर यावर तो ५-१० सेकंद थांबून म्हणाला “माफ करा सर माझा नाइलाज आहे.”
इतकं बोलुन जो त्याचा कॉल कट झाला आजतागायत फोन लागला नाही पुन्हा...!
तो मुलगा Shine.com वाल्यांचाच होता. कारण त्यानंतर माझ्या वाचनात आले की, शाईन च्या नावाखाली काही लोक फसवणुक करतात. मला याची खात्री आहे कारण शाईनच्या ऑफिशियल वेबसाईट वरुन मी तो नंबर घेतला होता आणि त्याला कॉल केला होता. आम्हाला जे मेल येत होते लिंक चे ते पण शाइन च्या मेल आयडी वरुन यायचे.
पण, आम्ही फसलो १०००० रुपयाने. चूक आमचीच म्हणावी लागेल. पण हे लोक असेच काही गरीब मुलांना नोकरीची लालुच दाखवुन लुटतात, त्यामुळे ती मुले इतकी खचतात मानसीक रित्या की, आयुष्यात पुढे कोणतेही पाउल टाकताना घाबरायला लागतात.
आणखी वाचा:- अशी होते ऑनलाईन फसवणूक, तुम्हाला माहित आहे का?

थोडक्यात...
नोकरी मिळवून देतो, या नावाखाली बऱ्याच ऑनलाईन कंपन्या कडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या बेरोजगार लोकांची फसवणूक होत असते. काही लोक त्यासाठी तक्रार पण करतात, परंतु त्यावर त्यांना कोणतीच मदत मिळत नाही. कारण यात आपलीच चूक असते, स्वतःहून आपल्या बँकेच्या डिटेल्स इतरांना शेयर केल्यावर पोलीस सुद्धा काहीच करू शकत नाही.
मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगू इच्छितो कि, खाजगी नोकरी मिळवण्यासाठी कोणतीच कंपनी उमेदवाराकडून कुठलेच शुल्क घेत नाही. जर असे तुम्हाला कोणी सांगत असेल तर, तो तुमची शुद्ध फसवणूक करत आहे.
सावधान राहा, सुरक्षित राहा...!

अशाच फसवणुकीच्या नवीन सत्य घटना जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्स अँप ग्रुपमध्ये सहभागी व्हा!