PMFME Scheme: अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळतेय १० लाख ते ३ कोटींपर्यंतचे अनुदान
देशभरातील चालू आणि नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जात आहे.या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्याला संबंधित प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के किंवा कमीत कमी १० लाख तर गट लाभार्थ्यांसाठी ३५ टक्के किंवा ३ कोटी रूपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सामावेश असून सर्व उद्योजक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ
- आजारी सूक्ष्म उद्योगांनाही बँक कर्जास पात्र होत असल्यास लाभ मिळणार
- पारंपारिक आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार
- एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) साठी प्राधान्य
- दिल्या जाणाऱ्या ३५ टक्के अनुदानापैकी ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्याचा वाटा असेल
- सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून करता येईल
- एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल
- ही योजना २०२०-२१ पासून २०२४-२५ या पाच वर्षांसाठी लागू असणार आहे.
लाभ कोणाला मिळेल ?
वैयक्तिक लाभार्थी, प्रगतशील शेतकरी, नवउद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी/भागिदारी, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता गट, गैर सरकारी संस्था, सहकारी संस्था आणि त्यांचे फेडरेशन, खासगी कंपनी इत्यादीकोणत्या उत्पादनाच्या प्रक्रिया उद्योंगांसाठी मिळेल लाभ?
नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, गूळ इत्यादींवर आधारिक उत्पादने, दुग्ध व पशू उत्पादने, सागरी उत्पादने, मांस उत्पादने, वन उत्पादने इत्यादी उत्पादनांचा सामावेशदरम्यान, ज्या उद्योजकांना या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे त्या अर्जदारांनी जवळच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटून सविस्तर माहिती घ्यावी आणि त्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करावी. त्याचबरोबर आपण ज्या बँकेतून कर्ज घेणार आहोत त्या बँकेच्या व्यवस्थापकाला भेटून यासंदर्भातील माहिती द्यावी.
अर्ज प्रक्रिया व नोंदणी साठी. – येथे क्लिक करा.