Online Traffic Challan Check : तुमच्या बाईक वर असलेला दंड ऑनलाईन चेक करा फक्त २ मिनिटात, तेही तुमच्या मोबाइलवर…!
काहींना येवढी घाई असते की सिग्नलवर जर ट्रॅफिक पोलिस नसेल तर ती लोक सिग्नल चे नियम तोडतात परंतु सिग्नल वर असलेल्या कॅमेऱ्यात ते दिसून येतात. अशा गाड्यांचा नंबर पोलिसांकडून सीसीटीव्ही च्या माध्यमातून उपलब्ध केला जातो. आणि संबंधित गाडीवर फाईन टाकला जातो. जर तुमच्या गाडीवर फाईन टाकला असेल आणि तुमच्या गाडीला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला असेल त्या नंबर वर तुम्हाला आरटीओ मधून एक मॅसेज प्राप्त होतो आणि तुम्हाला समजते की फाईन टाकलेला आहे.
पण कधीकधी काही वाहन चालकांचा मोबाईल नंबर त्यांच्या गाडीला रजिस्टर नसतो. तेव्हा त्यांना गाडीवर फाईन टाकलेला आहे का नाही हे कळत नाही. तर मग हा फाईन कसा पाहणार पाहणार यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे.
या माहितीमध्ये तुमच्या गाडीला किती फाईन लागला आहे, कोणत्या प्रकारचा फाईन लागला आहे, त्या ऑफिसर चे नाव, ठिकाण आणि त्याचा फोटो याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळते.
तर चला आपण पाहूया आपल्या गाडीवर पोलिसांनी किती फाईन टाकला आहे? आणि तो घरबसल्या आपल्या मोबाईलवर कसा पाहायचा? ते पुढीलप्रमाणे….
तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन कसा चेक करायाचा ?
- सर्वप्रथम ट्रॅफिक चालानच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. येथे क्लिक करा
- त्यानंतर मोबाईलवर एक न्यू टॅब ओपन होईल, त्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील ‘वेहिकल नंबर’ आणि ‘ चलान नंबर’ त्यापैकी तुम्ही एक पर्याय निवडा.
- तुम्ही जर वेहिकल नंबर हा पर्याय निवडला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर खाली दिलेल्या कॉलम मध्ये भरावा लागेल.
- नंतर तुमच्या गाडीच्या चेसिस नंबर किंवा इंजिन नंबर त्या कॉलम मध्ये भरा. (इंजिन नंबर आणि चेसिस नंबर गाडीच्या डॉक्युमेंट वर दिलेला असतो) त्यातील शेवटचे चार अंक त्या कॉलम मध्ये भरा.
- त्यानंतर ‘I am not robot’ या कॅप्चर वर क्लिक करून सबमिट करा.
- त्यानंतर मोबाईलवर एक नवीन टॅब ओपन होईल त्यामध्ये गाडीवर किती फाईन आहे हे तुम्ही पाहू शकता.
- तसेच त्या टॅबवर एक ‘व्ह्यू ‘ हा पर्याय दिसेल त्या पर्यायाच्या खाली एक डोळ्या सारखे चिन्ह दिसेल त्या चिन्हावर क्लिक करा. ज्या ठिकाणी फाईन बसलेला आहे त्याचा फोटो तुम्हाला दिसेल.
- तसेच समोरच्या कॉलम मध्ये तुम्हाला किती फाईन बसलेला आहे याचीही सविस्तर माहिती मिळेल.
- या मध्ये तुम्हाला कोणत्या दिवशी फाईन बसलेला आहे, त्याची तारीख, गाडीचा नंबर आणि फाईन चे पेमेंट पेड झाले की नाही हे सुद्धा कळेल.
- तसेच तो फाईन कोणी मारला हे जर माहीत करून घ्यायचे असेल तर व्ह्यूव (View) या पर्यायाच्या खाली डोळ्या सारखं चिन्ह दिसेल त्या चिन्हावर क्लिक करा आणि पी.डी.एफ. डाऊनलोड करा.
- ती पी.डी.एफ. ओपन करा त्यामध्ये तुम्हाला फाईन लावलेल्या ऑफिसरचे नाव, गाडीच्या ओनर चे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर दिसेल.
- त्या पी.डी.एफ. मध्ये तुम्हाला एव्हिडन्स (Evidence) कॉलम मध्ये इमेज 1 आणि इमेज 2 हे ऑप्शन दिसतील त्यावर क्लिक करा.
- यावरून तुम्हाला कळेल की कोणत्या जागेवर फाईन मारलेला आहे आणि तसेच त्याचा फोटो तुम्हाला दिसेल.
- एकंदरीत यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे फाईन मारले आहे आणि त्या संबंधित सविस्तर माहिती दिलेली असेल.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवर किती फाईन आहे आणि तो कोणत्या ऑफिसरने टाकलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी टाकला आहे, याबद्दलची सविस्तर माहिती घरी बसल्या दोन मिनिटात मोबाईलवर पाहू शकता.
अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या व्हाट्स अप ग्रुपला जॉईन करा.