स्टेट बँकेच्या बुलढाणा आणि बीड शाखेत रिलेशनशिप ऑफिसर पदासाठी डायरेक्ट भरती, असा करा अर्ज!
SBI Securities | Hiring For Relationship officer|Beed|Buldhana: स्टेट बँकेच्या बुलढाणा आणि बीड शाखेत रिलेशनशिप ऑफिसर पदासाठी डायरेक्ट भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , नोकरीचे वर्णन, पात्रता, भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत.त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ई-मेल आणि व्हाट्सअँप द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
पदांची नावे आणि पद संख्या
1) रिलेशनशिप ऑफिसर (सेल्स ऑफिसर) - ०५ जागा
शैक्षणिक पात्रता व अटी:
1) किमान पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर. (विक्री आणि विपणन मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य)
वयोमर्यादा:
१) उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे .२) उमेदवाराचे कमाल वय २९ वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
३) २०२१, २०२२, २०२३ साली पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क:
- शुल्क नाही.
इतर माहिती:
- विक्री अधिकारी
- बँकिंग
- BFSI , गुंतवणूक आणि व्यापार
- पूर्ण वेळ, कायम
- बँकिंग ऑपरेशन्स
- शिक्षण कोणत्याही शाखेचा पदवीधर
- मुख्य कौशल्ये: डिमॅट,क्रॉस सेल्स,विक्रीखाते उघडणे,विक्री आणि विपणन