सीबील स्कोर (Cibil Score) म्हणजे काय?
सीबील (Cibil) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड (आताची ट्रांसयूनियन सिबिल लिमिटेड) ऑगस्ट २००० मध्ये स्थापन झालेली ही भारतातील पहिली पत माहिती कंपनी आहे. ती कंपनी /व्यक्ती व व्यावसायिक संस्थांच्या पत रेकॉर्ड संकलित करते व देखरेख करते. यात कर्ज आणि क्रेडिट कार्डशी संबंधित इत्यंभूत माहिती समाविष्ट आहे.आणि यात सुमारे ६० कोटी व्यक्ती आणि ४ कोटी व्यवसायांच्या पत विषयक परिपूर्ण महितीचा समावेश आहे. CIBIL ही भारतात काम करणार्या चार क्रेडिट ब्युरोपैकी एक आहे आणि २०१६ पासून अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ट्रान्सयूनियनचा एक भाग आहे.
तुम्ही मध्यमवर्गीय असा अथवा उद्योगपती असा, बँकेकडून कर्ज हे कधी ना कधी घ्यावे लागतेच मग तेंव्हा ह्या सिबील प्रकाराचे महत्व कळते. आणि जेव्हा कर्ज हवे असते, तेव्हा तुम्हाला कर्जाची किती गरज आहे हे कागदोपत्री सिद्ध करावे लागते हा आपल्याकडील बँकिंगचा अघोषीत नियम आहे.
महत्वाच्या सर्व कर्जवाटप संस्था / सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकासुद्धा सिबील तपासल्याशिवाय अजिबात कर्ज मंजूर करत नाही, मग ते १० हज़ाराचे असो वा १० कोटीचे असो.
तुम्ही घेतलेली जवळपास सगळी कर्जे आणि त्याचा कच्चाचिठ्ठा सिबिल कडे असतो, तुम्ही कर्ज कधी घेतले, किती घेतले, का घेतले, कसे फेडले, फेडले का नाही किंवा फेडताना कसा त्रास दिला, तुम्ही कुठे राहता, कुठे काम करता, तुम्ही किती शिकलात इतकाच काय तर तुमच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? अशी सर्वच माहिती सिबील मधे जतन केली जाते. मग त्याचे परीक्षण केले जाते आणि त्यावरुन तुमची पत ठरविली जाते.
एक गोष्ट लक्षात असू द्या की क्रेडिट स्कोअर बनविण्यात बँकेचा प्रत्यक्ष असा काहीच सहभाग नसतो. सिबील किंवा तत्सम संस्था या पूर्णतः खाजगी संस्था असून बँका व इतर आर्थिक क्षेत्रातील संस्था या आपल्या डिफौल्टरची नावे या संस्थाना पुरवतात.
आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे कि, बँकेने डिफॉल्टर म्हणून घोषित केल्यास पुढील किती वर्षे कर्ज घेणे अवघड असते?
एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर वाईट असेल, तर त्याचा अर्थ त्याने आपले कर्जाचे हप्ते चुकवले/थकवले आहेत. आणि जोपर्यंत तो आपले पूर्ण कर्ज चुकवत नाही तोपर्यंत बँकेकडून कर्ज चुकविल्याचा रिपोर्ट या संस्थाना पाठविला जाणार नाही.
आणि जोपर्यंत तसा रिपोर्ट बँकेकडून सीबीलकडे जात नाही, तोपर्यंत तुमचा सिबील स्कोअर सुधारणार नाही व जोपर्यंत तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणार नाही, तोपर्यंत तुम्हाला नवे कर्जही मिळणार नाही.
आणि जर तुम्ही तुमचे थकीत कर्ज पूर्ण भरले असेल तर काही महिन्यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल आपोआपच सुधारलेला दिसेल.
आता दुसऱ्या प्रश्नाकडे पाहू, डिफॉल्टर घोषित केल्यानंतर काही वर्षाने आपला क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक कर्ज देऊ शकते का?
अर्थातच, तुम्ही तुमचा सिबील स्कोअर चांगला ठेवला तर बँक तुमचे स्वागतच करेल!