Maharashtra Talathi Bharti जाहिरात: एकूण 4,644 तलाठी पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज!
Maharashtra Talathi Bharti 2023: महसूल विभागाकडून सदर तलाठी पदभरती जाहिरात अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत येणाऱ्या तलाठी संवर्गातील एकूण 4,644 पदांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली असून, सदर पदभरती जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार असून, सदर पदभरती बाबतची सविस्तर माहिती पुढीप्रमाणे…
Maharashtra Talathi Bharti 2023
पदाचे नाव – तलाठीएकूण पद संख्या – 4,644
शैक्षणिक पात्रता व अटी:
१) तलाठी पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे.२) MSCIT संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा:
१) उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे .२) उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
३) मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे.
परीक्षा स्वरूप:
१) परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.२) उमेदवारांची 200 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
३) ही परीक्षा ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे.
४) स्वतंत्रपणे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या जाणार आहेत.
५) एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
६) सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका चे स्वरूप व त्यांची काठीण्यता तपासून, समानीकरण पद्धतीने गुण निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
वेतनमान:
१) तलाठी संवर्गाकरीता सातव्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100/- रुपये दरम्यान वेतन अदा करण्यात येणार आहे.२) महागाई भत्ता व नियमानुसार देय इतर भत्ते अदा करण्यात येणार आहेत.
अर्ज शुल्क
१) जनरल उमेदवारांसाठी 1,000/- आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे.
२) राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
इतर माहिती:
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख – 23 जुन 2023 आहे.अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जुन 2023 आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 23:55 मिनिटापर्यंत.
अर्ज कुठे आणि कसा करावा:
अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा.जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पूर्ण आणि सविस्तर वाचा.