दि चिखली अर्बन को-ऑप बँक, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ पदांसाठी भरती, असे करा अर्ज.
चिखली अर्बन को-ऑप बँकेत विविध पदांच्या ४२ जागा: दि चिखली अर्बन को-ऑप बँक, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
त्यासाठी विहीत कालावधीमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर लागु असलेले भत्ते, तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे...
पदांची नावे आणि पद संख्या
पदांची नावे- कनिष्ठ अधिकारी, सोशल मिडिया समन्वयक, वसूली सहाय्यक शिपाई/ ड्राइवर आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा
एकुण भरली जाणारी पदे – ४२
शैक्षणिक पात्रता
सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज प्रक्रिया
१) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.२) अर्ज सादर करण्याचा पत्ता – चिखली अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बुलढाणा, मुख्य कार्यालय, दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.,चिखली, शाखा- बुलढाणा, पिनकोड- ४४३२०१
३) अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक २२ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहाजाहिरात पाहा – येथे क्लिक करा.